वणी तालुक्यात वाघाची दहशत, दोन कालवडी ठार

download (1)
वणी, दि़२४ – तालुक्यामध्ये वाघाने गत काही महिन्यापासून चांगलीच दहशत निर्माण केली आहे़ यामुळे शेतकरी शेतमजूरासह नागरिकात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ दि़२३ मार्चला मध्यरात्री शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन कालवडीचा वाघाने फडशा पाडला़
वणी, झरी व मारेगांव या तीन्ही तालुक्यामध्ये जंगलव्याप्त परिसर मोठा आहे़ गत एक वर्षापासून सातत्याने होत असलेले वाघ्रदर्शन तसेच मानवप्राण्यावर होणारे हल्ले नियमित झाले आहे़ झरी जामणी तालुक्यामधील दुभाटी पोड येथील महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली़ वाघाने अनेक पशुधनाचा फडशा पाडला़ यामुळे शेतकरी शेतमजूर वर्गात कमालीची दहशत निर्माण झाली आहे़ जंगलालगत असलेल्या शेतामध्ये शेतीकामाकरीता जाण्यास मजूरवर्ग धजावत नाही़ तालुक्यात आठ-दहा दिवसाच्या अंतराने पशूधनावर वाघाचे हल्ले सुरूच आहेत़ दहेगांव येथील भाऊराव बापूराव गोहोकार व दिलीप मारोती महाकुलकार या शेतकºयांची जणावरे शेतातील गोठ्यात बांधण्यात येतात़ मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला करुन दोन कालवडीचा फडशा पाडला़ ही बाब सकाळी संबंधीत शेतकºयांना माहित होताच त्यांनी ग्रामस्थांना सांगीतले़ तसेच वनविभागाला सुचित करण्यात आले़ परंतू तीन्ही तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा निवेदने देवून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली होती़ मात्र ठोस उपाययोजना वनविभागाकडून होतांना दिसत नाही़ यामुळे परिसरातील, नागरिक, शेतमजूर व शेतकरी प्रचंड दहशतीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 × four =