वर्षभरात भारतीयांची कोट्यावधींची मालमत्ता चोरीला

theft
नवी दिल्ली – संपूर्ण देशभरातून गेल्या वर्षभरात १३ हजार २१९ कोटी रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवाल विभागाच्या २०१३ च्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या दहा वर्षातील ही दुसरी सर्वात मोठी आकडेवारी आहे. विशेष म्हणजे चोरी गेलेल्या मालमत्तेपैकी एक हजार ७६२ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिवसेंदिवस वस्तूंच्या वाढत्या किंमतीमुळे चोरी गेलेल्या वस्तूंच्या मालमत्तेच्या किंमतीत वाढ होत असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. वाहनांची चोरी मोठ्य़ा प्रमाणात होते. चोरी केलेल्या मालमत्तेत तीस टक्के वाहनांचा समावेश असतो. कोलकाता, चेन्नई आणि मुंबईतील एकूण मिळून वाहने एकट्या दिल्ली शहरात आहेत. असे पोलिस अधिकारी म्हणाले. रोख, दागिने आणि वाहने यांची चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते.
२०१२ मध्ये २१ लाख, सात हजार १९४ लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेली त्यापैकी एक लाख, ४१ हजार ७९३ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. गेल्या दहा वर्षात चोरी केल्या जाणा-या मालमत्तेत ६६१.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण कमी म्हणजेच -४८.३ टक्के इतके आहे.
संपूर्ण राज्याचा विचार केला, तर २०१३मध्ये राज्यातून ४ हजार ३१५ कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला होती. त्या तुलनेत ३१९ कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अवघा ७.४ टक्के ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोव्यामध्ये २०१३ मध्ये तीन हजार ४८ कोटी रुपयांची मालमत्ता चोरीस गेली होती. तर तामिळनाडूमध्ये २०१३ मध्ये ७३.६ टक्के चोरी झालेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली. त्यापाठोपाठ सिक्कीम(५१.९), आंध्र प्रदेश(५१.७) आणि राजस्थान(५०.७) टक्के मालमत्ता २०१३ मध्ये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. गोव्यामध्ये २०१३ मध्ये सर्वात कमी म्हणजेच केवळ ०.१ टक्के मालमत्ता पोलिसांना हस्तगत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 9 = eighteen