वाघाचा शेतमजूरावर हल्ला

IMG-20141125-WA0026_resized
वणी – तालुक्यातील नवरगाव येथे शेतात कापूस वेचणाºया शेतमजूर युवकाावर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला चढविला मात्र युवकाने प्रतिकार केल्याने जीव वाचला असून पायाला दुखापत झाली आहे़ संतोष मोतीराम आत्राम  असे जखमी युवकाचे नाव आहे. वणी उपविभागात वाघाने चांगलीच दहशत निर्माण केली असून, झरी जामणी व वणी तालुक्यात व्याघ्रदर्शन सातत्याने होत असल्याने शेतकरी, शेतमजूर चांगलेच दहशतीत आहे़
वणी परिसरामध्ये सातत्याने व्यााघ्रदर्शन होतांना दिसत असून झरी जामणी तालुक्यासह वणी परिसरातील शेतकºयांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे़ शेतकºयांच्या पाळीव जणावरांचा फडशा वाघ पाडतांना दिसत असून वनविभाग कुठलिही उपाययोजना करताना दिसत नाही़ नामदेव राजूरकर यांच्या शेतात शेतमजूर कापूस वेचत असतांना दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने संतोष आत्राम या युवकावर झडप मारली़ अचानक घडलेल्या घटनेमुळे युवक काही काळ घाबरला मात्र प्रसंगावधान राखून त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता वाघाने युवकाचा पायाचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला़ संतोषने आराडाओरड केल्याने   शेतातील मजूरांनी वाघाला पिटाळून लावले़ तसेच वाघाला जेरबंद करण्याकरीता गावातील युवकांनी प्रयत्न केले असता शेतालगत असणाºया झुडपातून संजय जेनेकार या युवकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्याचा हाताला किरकोळ इजा झाली आहे़ या घटनेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचित करण्यात आले. जखमी संतोषला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आह़े
वणी उपविभागात सुरु असलेल्या वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर प्रचंड धास्तावले असून काही महिन्यापूर्वी दुभाटी येथील महिलेला वाघाने ठार केले होते़ तसेच अनेकावर हल्ला चढविला़ नुकतेच काही दिवसापूर्वी सुकनेगांव परिसरात वाघाने रोहीची शिकार केल्याची घटना घडली आहे़ सातत्याने होत असलेले व्याघ्रदर्शन शेतकरी व शेतमजूरामध्ये दहशत निर्माण करीत असून वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight + 7 =