
आर्णी (यवतमाळ), दि. २२ – शेतात असलेल्या बैलावर झडप घालून फडशा पाडण्यात आल्याची घटना माळेगाव येथील गौरी नारायण चव्हाण यांच्या शेतात घडली.
वाघ बैलाचा फडशा पाडत असल्याचे दिसताच महिलेने आरडा ओरड केल्यानंतर वाघ पळून गेला. या घटनेची माहिती वनपाल अधिकारी चव्हाण मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यापूर्वी गावातील संतोष पोहरे, नाना चौधरी यांच्यावर शेतात जात असताना अस्वलाने हल्ला चढून गंभीर जखमी केले होते. मागील दोन महिन्यापूर्वी केळझरा, सावळी, नाईकनगर, भानसरा या परिसरात शेतकºयांना शेतात वाघाच्या पायाचे ठसे दिसले होते. वन विभागाच्या अधिकाºयांनी त्या ठशाचे निरीक्षण करून पट्टेदार वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वनविभागाने महिला शेतकºयाला नुकसान भरपाई देवून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









