वाघिनीच्या हल्ल्यात महिला जखमी

tiger-killing-52ca51f11944b_m

झरी (यवतमाळ) ,दि. १३ – तालुक्यातील मुकुटबन येथील जंगलात सरपन जमा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिनीने हल्ला केल्याची घटना आज दुपारी दोन वाजता घडली. या हल्ल्यात शकीलाबानो शेख वहाब (५५) ही महिला जखमी झाली.
मुकुटबन येथील पाच महिला आज सरपन जमा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. यावेळी त्यांना जंगलात वाघिन आणि दोन बछडे दिसले. वाघ आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच सर्व महिलांनी तेथून पळ काढला. अशातच धावत असताना शकीलाबानो शेख वहाब ही महिला खाली पडल्याने जखमी झाली. जखमी महिलेला तात्काळ वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नपारखी यांना विचारले असता त्यांनीही या घटनेला दुजोरा दिला. परिसरातील मार्की, शेकापूर आणि मांगली परिसरात यापूर्वी वाघाने गाई-बैलांवर हल्ला चढवला होता. आता गावालगत असलेल्या जंगलात सरपन जमा करणाºया महिलांवर वाघिनीचा हल्ला झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. आता तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी गावकºयांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× four = 32