
यवतमाळ – चाकूच्या धाकावर वाटमारी करणाºया तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सचिन शामराव राऊत (२८) रा. भोसा, संजय चुन्नीलाल चौधरी (२६) रा. भोसा, रवींद्र महादेव कटरे (३१) रा. नारींगेनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
या चोरट्यांनी महिलेसह एका व्यापाºयाला काही महिन्यापूर्वी लुटले होते. संजय चौधरी हा पाच सहा वर्षापूर्वी भोसारोडवरील व्यापारी आनंद केलाणी यांच्याकडे नोकर होता. त्याला मालकाचा नित्यक्रम माहित होता. आनंद केलाणी यांच्याबद्दल इत्यंभूत माहिती मित्र सचिन राऊत व रवींद्र चौधरी यांना दिली. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान केलाणी यांना भोसा बायपासवर अडवून चाकूने जखमी करून सोन्याची चैन हिसकावून नेली होती. तसेच पाच महिन्यापूर्वी समर्थवाडी परीसरातून पायदळ जाणाºया राजुरकर नामक वृद्ध महिलेच्या गळ््यातील सोन्याची पोत लांबविली होती. या गुन्ह्याची कबुली तिघांनी दिली आहे. त्यांच्याकडून पुन्हा काही चोरीच्या घटनांची माहिती येण्याची शक्यता असल्याने वडगाव रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडके, सचिन हुमने, योगेश डगवार,आशीष चौबे, सय्यद साजिद यांनी केली.









