विधानपरिषदेच्या चार जागांसाठी पोट निवडणूक

vidhan-mandal
मुंबई  दि. ८  – विधानपरिषदेच्या चार रिक्त जागांसाठी ३० जानेवारीला पोटनिवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरूवारी केली. पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे, आशिष शेलार हे विधानपरिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. तर विनायक मेटे यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या चार जागांवर आता पोट निवडणूक होणार आहे.
विधानपरिषद पोटनिवडणुकीची आधिसूचना १३ जानेवारीपासून लागू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी असेल. त्यानंतर ३० जानेवारीला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी पाच वाजता मतमोजणी होईल. त्यानंतर विजयी उमेदवारांची घोषणा होईल.
पृथ्वीराज चव्हाण आणि विनायक मेटे यांची जुलै २०१६ मध्ये संपणार होती. दोघांचीही मुदत एकाच दिवशी संपणार असल्याने या दोन जागांसाठी एकत्रीत निवडणूक होईल. आशिष शेलार यांच्या सदस्यत्वाची मुदतही जुलै २०१८ पर्यंत होती. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची एप्रिल २०२० पर्यंत मुदत होती. या दोघांचाही कार्यकाळ वेगळा होता. त्यामुळे या स्वतंत्र निवडणूका होतील त्यासाठी मतपत्रिकाही वेगळ्या असतील असे विधीमंडळ सचिवालया मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी २० ऑक्टोबर २०१४ ला विधानपरिषद सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. तर १३ ऑक्टोबरला अपात्र ठरवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 6 = eighteen