विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष कारावास

2014-10-15~court_ns
नेर, दि. १५  – मुलाला मारहाण करून महीलेचा विनयभंग करणाºया वटफळी येथील आरोपीस एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या. एस. डी. सरोदे यांनी आज गुरुवारी हा निकाल दिला.
भगवान परसराम चव्हाण (४०) रा. वटफळी असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. ३ जुलै २०१३ रोजी दुपारी गावातीलच एका मुलाला मारहाण करून महीलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी नेर पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३२३, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जमादार शंकर आडे यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या. एस.डी. सरोदे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुणावनी पार पडली. फिर्यादी महीलेसह अन्य साक्षदारांच्या साक्ष नोंदविल्यानंतर दोष सिद्घ झाल्याने आरोपी भगवान चव्हाण यास भादंवि कलम ३२३ अंतर्गत एक महीना शिक्षा व ३४५ मध्ये एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. आर.बि. भेंडे यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 7 = thirty five