
यवतमाळ, दि. २४ – कळंब तालुक्यातील हिरडी येथील महिलेचा विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्षाची शिक्षा ठोठावली. पहिले तदर्थ सत्रन्यायाधिश एम.टी. असीम यांनी आज बुधवारी हा निकाल दिला.
महेश तुळशिराम नागपूरे (३५) रा. वाढोणा (खु.) असे आरोपीचे नाव आहे. गावालगत असलेल्या हिरडी येथे तो कामानिमित्य जात होता. अशातच त्याची नजर गावातील एका महिलेवर गेली होती. कळंब येथील बाजारात सदर महिलेला भेटून तीच्याकडे शारिरीक सुखाची मागणी केली. मात्र तीने विरोध केला होता. दरम्यान १९ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री पतीला जेवन देऊन ती लघुशंकेसाठी घराबाहेर गेली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पकडून विनयभंग करून ढकलुन दिले. त्यामुळे तीच्या डोक्यावर व डोळ््याला जबर मार लागला होता. यावेळी तीने आरडाओरड केल्याने आरोपीने घटनास्थळारवरून पळ काढला. २० सप्टेंबर रोजी पिडीत महिलेने कळंब पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ४४८, ३२४ व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. पांढरकवड्याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांनी आरोपीस अटक प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील पहिले तदर्थ सत्र न्यायाधिश एम.टी. असीम याच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐंकुन घेतला. सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी, तीचा पती, डॉक्टर, तपास अधिकारी व अन्य दोन जणांच्या साक्ष तपासण्यात आल्या. यामध्ये दोषी आढळून आल्याने आरोपी महेश नागपूरे यास भादंवि कलम ३५४ अंतर्गत एक वर्ष व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुणावली. ३५४ (अ) अंतर्गत तीन महिने व ३०० रुपये दंड, ४४८ मध्ये १५ दिवस व ३०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता व सहाय्यक सरकारी वकील अॅड. अरुण मोहोड यांनी काम बघीतले.









