
यवतमाळ दि. 30 : खाद्य पदार्थाची शुध्दता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने वर्षभर ठिकाणीकाणी धाडी टाकून पदार्थांच्या तपासण्या व नमुने घेतल्या जाते. गेल्या वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडी व कार्यवाहीत विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघ करणाऱ्या अन्न विक्री संस्थांकडून 60 लाख 31 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
खाद्य पदार्थांची शुध्दता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मानकाप्रमाणे असणे आवश्यक आहे. अनेकदा अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशान पदार्थांमध्ये भेसळ करून नागरीकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार अन्न निर्माते व विक्री संस्थांकडून होतो. यावर आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी पदार्थांच्या तपासण्या केल्या जातात. भेसळ असल्याची शंका असल्यास नमुने घेऊन तपासणी साठी पाठविले जाते. बरेचदा भेसळीसंदर्भात नागरीकांच्याही तक्रारी असतांना अशा तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने धाड घालून पदार्थांची शुध्दता तपासली जाते.
अनेकदा विक्री परवाना नसतांना विविध खाद्य पदार्थांचे दुकान लागवे जाते. या दुकानांवर नियमितपणे कार्यवाही करण्यात येते. ज्या दुकानांकडे परवाना नाही त्यांना दंड आकारला जातो. शिवाय त्यांना अभिलेखे संगणकीकृत करून अधिकृत परवाना घेण्याबाबत प्रवृत्त केले जाते. जिल्ह्यात अशा परवाना नसलेल्या आणि कायद्याचे उल्लंघन करीत असलेल्या संस्थांवर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे.
गेल्या वर्षात नोंदणी किंवा परवाना नसलेल्या आणि कायद्याचे उल्लंघ केल्याप्रकरणी जिल्ह्यात एकून 404 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. तर 163 ठिकाणी अन्नांचे नमुने घेण्यात आले. विविध 35 ठिकाणी धाडी व जप्तीची मोहिम राबविण्यात आली. या सर्व कार्यवाहीत एकून 60 लाख 31 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. विविध 34 प्रकरणात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून यातील 5 प्रकरणांची न्यायालयस्तरावर अंतीम टप्प्यात आहे. जिल्ह्यात अन्न निर्मितीच्या 71 तर विक्रीच्या 11324 संस्था कार्यरत आहे. गेल्यावर्षी 6173 विक्री संस्थांची नोंदणी करून त्यांना परवाने देण्यात आले आहे. या संस्थांकडून नोंदणी शुल्कापोटी 56 लाखाचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे.
औषध विक्रीचे 81 परवाने रद्द
गेल्यावर्षात जिल्ह्यात अन्न व औषध विभागाच्यावतीने 358 औषधी आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या. यापैकी कायद्यातील तरतुदींची पुर्तता न करणाऱ्या 81 आस्थापनांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. तसेच 26 परवाने काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते. ठिकठिकाणी 22 औषधांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 5 अप्रमाणित आढळून आल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही व न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहे.









