विमान अपघातात १८

काठमांडू –  नेपाळमध्ये एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावरून पर्यटकांना घेऊन येणारे छोटे विमान जंगलात कोसळल्याने विमानातील सर्वजण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात १५ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर्सचा समावेश होता. नेपाळी एअरलाइन्सच्या मालकीचे १९ आसनी ट्विन ओट्टर या विमानाने आज दुपारी १२.४० वाजता पोखरा येथील विमानतळाहून उड्डाण केले होते. परंतु उड्डाणानंतर केवळ १५ मिनिटात हे विमान रडारवरून अदृष्य झाले. अर्घाखांची जिल्ह्यातील खिदीमच्या जंगलात हे विमान कोसळल्याचे सांगण्यात येते. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी मरण पावले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमानत १४ नेपाळी नागरिक व एक डॅनिश नागरिकाचा समावेश होता.जंगलातील अपघात स्थळाचा शोध लागला असून बचावकार्य सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेच्या कारणावरून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात युरोपियन युनियनने नेपाळमधील सर्व विमान कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 2 = two