विवाहीतेची आत्महत्या, दहाजणांवर गुन्हा

images
यवतमाळ, दि. २१ – हुंड्याच्या कारणावरून मुलीच्या सासरच्यांनी अपमानस्पद वागणूक दिल्याने विवाहितेच्या वडीलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दहाजणाविरुद्व गुन्हा नोंदविला आहे. महादेव लंबे असे मृतकाचे नाव असून, मुकेश वानखडे, रवी वानखडे, शितल वानखडे, गुंफा वानखडे, अनिता धवने, वनिता नारमूदे, माया भगत, रमेश वानखडे, नितीन धवने, संध्या राऊत अशी आरोपींची नावे आहे. महादेव लंबे यांच्या मुलीचा विवाह काही महिन्यापूर्वी मुकेश वानखडे रा. किन्ही याचेशी झाला होता. सुरुवातीचे दिवस गुण्यागोंविदाने विवाहितेने सासरी घालविल्यानंतर पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ सुरू केला. माहेरवरून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावला. पती व सासू, सासरे पैशासाठी मारहाण करीत असल्याची बाब विवाहितेने वडील महादेव लंबे यांना सांगितली. त्यांनी मुलीच्या सासरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, वरील आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून लावले. मुलीच्या सासरकडून मिळालेली वागणूकीमुळे त्यांना मानसिक धक्का बसून, लंबे यांनी आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × two =