विविध अपघातात तीन ठार

index.jpeg00
यवतमाळ दि. २५ – जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याच्या घटना आज रविवारी घडल्या.
शेतकरी ठार
बोरी (अरब) – भरधाव वाहनाने धडक दिल्याने  कामनदेव येथील शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज रविवारी रात्री ७ वाजता यवतमाळ रोडवर गावालगत घडली.
किसन पवार (६०) रा. कामनदेव असे मृतकाचे नाव आहे. आज सायंकाळी ते शेतात जात होते. अशातच समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने पवार हे रक्ताच्या थारोळ््यात रस्त्यावर कोसळले. यावेळी चालकाने वाहनासह तेथून पोबारा केला. घटनेनंतर अर्धा तास तेथेच पडून राहील्याने पवार यांचा जागीच मृत्यू  झाला. या घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
इसम जागीच ठार
उमरखेड – महागाववरून उमरखेडकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने इसम जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता घडली. किसन रामसिंग पवार (५८) रा. चिल्ली असे मृतकाचे नाव आहे. महागाव वरून उमरखेडकडे जाणाºया एम.एच. ३१/ सी कयु २४२९ क्रमांकाच्या ट्रकने चिल्ली या गावाजवळ पवार यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी इंदल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अज्ञात वाहनाने एकाचा मृत्यू
यवतमाळ – अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार झाल्याची घटना दारव्ह्यानजीक घडली. गजानन वाघमारे रा. कुपटा असे मृताकचे नाव आहे. गजानन दुचाकीने जात असताना, समोरून येणाºया भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गजाननला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, याबाबत रमेश वाघमारे यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine + = 11