वीज पडून एक ठार

vij-3
यवतमाळ- वीज कोसळल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज आष्टोना शिवारात घडली. कालिदास अंबादास गोखरे (३४) असे मृताचे नाव आहे. कालिदास व त्याचा साथीदार सुनील देविदास भोयर दोघेही बाजारासाठी खैरी येथे जात असताना मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यांच्या बाजुलाच वीज कोसळल्याने यात कालिदासचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृताच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − = six