वीज पुरवठा खंडीत केल्याने शेतकºयाने घेतले विष

images
यवतमाळ – थकीत विज बिल वसुलीसाठी आलेल्या पथकाने विद्युत पुरवठा खंडीत करताच शेतकºयाने विष घेऊन पथकाच्या वाहनाचा पाठलाग केल्याची घटना आज शुक्रवारी दुपार दरम्यान घडली. कैलास नागोराव भोयर (२८) रा. सातेफळ असे विष प्राशन केलेल्या शेतकºयाचे नाव असून त्याच्याकडे वडीलोपार्जीत तीन एकर शेती आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी नापिकी झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर आता शेतकºयाची मदार रब्बी हंगामावर आहे. त्यातच विज वितरणच्या वतीने भारनियम व वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने पिकाला पाणी देणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकºयाना रात्रीच्यावेळी शेतात पिकाला पाणी द्यावे लागते. तर दुसरीकडे महाराष्टÑ राज्य विज वितरण कंपनीकडून शेतकºयासह नागरिकांकडील कृषी पंप व घरगुती विज बिलाची सक्तीने वसुली सुरू केली आहे. दरम्यान आज लोणी येथील विज वितरण कंपनीच्या अधिकाºयांचे पथक सातेफळ येथे आले होते. या पथकाने ज्या नागरिकांकडे थकीत बिल आहे. त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करणे सुरू केले. आज दुपारी सदर पथक कैलास भोयर या शेतकºयाच्या घरीही धडकले. थकबाकी जमा करा नाही तर विद्युत पुरवठा खंडीत करणार असा दम अधिकाºयांनी या शेतकºयाला दिला. यावेळी शेतकºयाने साहेब, यावर्षी नापिकी झाल्याने पैसे नसून काही वेळ देऊन हप्ता पाडून द्या, आर्त विनवणी केली. मात्र अधिकाºयाने काहीही न ऐकता बिलाचे पैसे न दिल्याने खांबावर चढून वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे अगतिक झालेल्या शेतकºयाने घरात जाऊन विषारी औषध प्राशन करून विज कंपनीच्या पथकाच्या वाहनामागे धावत सुटला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईक व नागरिकांनी या पथकाचे वाहन थांबवून सदर शेतकºयाला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याना यवतमाळ येथील कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेने गावकºयांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाºयाप्रती रोष व्यक्त केला. विज वितरण कडून सुरू असलेली सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी सरपंच प्रमोद वाघ, उपसरपंच रविंद्र राऊत, वैभव ठाकरे यांच्यासह गावकºयांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 × = twelve