वैद्यकीय व्यवसायावरही इंटरनेटचे अतिक्रमण

images.jpeg1
सध्याच्या जगात इंटरनेटशिवाय जगणे अशक्य बनले आहे. सध्याच्या जगातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवर अवलंबून आहे. घरबसल्या सर्व कामे इंटरनेटवरून सहजशक्य होतात. त्यामुळे मोबाइल रिचार्ज, रेल्वेची व विमानाची तिकिटे, ई-कॉमर्स आदी सर्व व्यवहार इंटरनेटवर सहजगत्या करतात येतात. तसेच जगातील विविध विषयांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे क्लिक करताच माहितीचा धबधबा कोसळतो. यामुळे व्यक्तीचे जीवन अत्यंत सोपे झाले आहे. वैद्यकीय व्यवसायावरही इंटरनेटचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे.
सध्या रुग्ण किंवा सर्वसामान्य व्यक्ती आपल्याला झालेल्या आजाराची माहिती पहिल्यांदा इंटरनेटवर घेतात. त्यानंतर ते डॉक्टरकडे जातात. त्यामुळे येत्या काही वर्षात इंटरनेट डॉक्टरची जागा घेण्याची शक्यता आहे. कारण आजारी असलेले बहुतांश लोक आपल्याला होणारा त्रास अन्य नेटिझन्सशी शेअर करीत आहेत. तसेच या नेटिझन्सकडून आजारावर विविध सल्ले मागत असल्याचे आढळले आहे. गेल्या दशकात इंटरनेटचा वापर आरोग्यविषयक कामासाठी अधिक होऊ लागला. २००१ ते २०१३ या काळातील रुग्णांच्या मुलाखती घेण्यात आल्या. २००० पूर्वी बहुतांश व्यक्ती आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ऑनलाइन माहिती घेत असत. मात्र त्यानंतर ते अन्य रुग्णांशी आपल्या आजाराविषयी चर्चा करून उपचाराची दिशा ठरवू लागले, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक स्यू झिआब्लँड यांनी सांगितले.
रुग्णांना केवळ माहिती ऐवजी आता वास्तविक सल्ल्याची आणि आधाराची अधिक गरज आहे. दरवर्षी कोटयवधी जण ऑक्सफर्डच्या www.healthtalkonline.org या वेबसाइटला भेट देतात. तेथे अन्य रुग्णांकडून ते आपल्या आजाराविषयी माहिती घेतात. चित्रपट, अ‍ॅनिमेशन, ध्वनी, चित्र, व्यक्तिगत अनुभव यांच्या माध्यमातून रुग्णांना त्याच्या आजाराची माहिती रंजकपणे मिळू शकते. यामुळे रुग्णांना आपल्या आजारावर उपचार करण्याची मानसिकता तयार होते. तसेच डॉक्टरला उपचारात मदत करू शकतात.इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन डॉक्टरही रुग्णांसाठी उपयुक्त वेबसाइट पाहण्याची शिफारस करत आहेत. मात्र इंटरनेटवरून माहिती घेऊन डॉक्टरशी चर्चा केल्याचे दुष्परिणाम डॉक्टर व रुग्ण संबंधावर होऊ शकतात, अशी भीतीही रुग्णांच्या मनात असते.जनरल प्रॅक्टिशनर आणि परिचारिका हे रुग्णांना इंटरनेटचा वापर करायला सांगतात. तसेच त्यांच्या रुग्णांना आपल्या आजाराविषयी अन्य रुग्णांशी चर्चा करायचा सल्ला देतात, असे झिआब्लॅँड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− three = 5