व्हिएतनाममध्ये हेलिकॉप्टरला अपघात , १६ जणांचा मृत्यू

8c05img_201562_235523452_240x180
हनोई (वृत्तसंस्था) – पॅराशूट प्रशिक्षण सरावादरम्यान व्हिएतनामच्या लष्कराचे हेलिकॉप्टर राजधानी हनोई येथे कोसळून झालेल्या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये एकूण २१ जण होते.
लष्कराचे डेप्युटी कमांडंट लेफ्टनंट कर्नल व्हो व्हॅन ट्युआन यांनी सांगितले, की प्राथमिक तपासात रशियन बनावटीच्या ‘एमआय १७१’ या चॉपर हेलिकॉप्टरचा हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान चांगले होते; तसेच यात काही घातपाताची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हेलिकॉप्टर ज्या थॅच या उपनगराच्या पसिरतात पडले तेथील स्थानिक महिला रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले, की हेलिकॉप्टरचा विचित्र आवाज ऐकून मी बाहेर आले त्याच वेळी हेलिकॉप्टर कोसळले आणि क्षणार्धात पेटले. हेलिकॉप्टर बाजारात वर्दळीच्या ठिकाणी तसेच घरांवर कोसळू नये यासाठी वैमानिकाने हेलिकॉप्टरची दिशा बदलून ते शेताकडे वळविले. अपघातस्थळावरून मदतीसाठीच्या हाका ऐकून स्थानिक रहिवासी मदतीसाठी तिकडे धावले, असे या महिलेने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 + eight =