‘व्हॉट्सअॅप’वरील चॅटिंग धोकादायक

WhatsApp-300x300
सध्या तरुण पिढीवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. फेसबुकनंतर आलेले ‘व्हॉट्सअॅप’ तरुण-तरुणींमध्ये प्रसिद्ध झाले आहे. उठण्या-झोपण्यापासून सर्व जण आपली माहिती मित्र, मैत्रिणींना शेअर करत असतात. मात्र अँड्रॉइड फोनमधील ‘व्हॉट्सअॅप’ वापरणा-यांना थोडे सावध व्हावे लागणार आहे. कारण तुम्ही ‘व्हॉट्सअॅप’वर चॅटिंग करताना कोणीही तुमच्या चॅट अकाउंटमध्ये ‘लॉगइन’ करून तुमचे संभाषण पाहू शकणार आहे.
पोर्तुगाल येथील सुरक्षा सल्लागारांच्या मते, अँड्रॉइड फोनच्या एसडी कार्डवर ‘व्हॉट्सअॅप’ संदेश साठवले जातात. मात्र अँड्राइड फोनमध्ये विविध अॅप्सची माहिती शेअर केली जात असल्याने कोणतेही अॅप ती माहिती वाचू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘व्हॉट्सअॅप’चा डेटाबेस एसडी कार्डवर केला जातो. अँड्रॉइड वापरणा-यांनी एसडी कार्ड वापरण्याची परवानगी दिल्यास ते अॅप्लिकेशन कोणीही वाचू शकतो, असे बास बोस्केर्ट यांनी ब्लॉगवर लिहिले आहे.
एखाद्याचा ‘व्हॉट्सअॅप’ डेटाबेस पाहायचा असल्यास तो साठवण्यासाठी जागेची गरज भासणार आहे. दुसरे म्हणजे तो डेटाबेस संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी अँड्रॉइड अॅप्लिकेशनची गरज लागणार आहे. प्ले स्टोर किंवा एपीके फाइलद्वारे एकदा अँड्रॉइड अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते अॅप फोनला नेटवर्क आणि एसडी कार्ड वापरण्यासाठी परवानगी मागते.
बोस्केर्ट यांनी हॅक करण्यासाठी वेब सव्र्हर सेट केला आणि नंतर फोनमध्ये विशेष परवानगी मागणारे अँड्रॉइड अॅप्लिकेशन तयार केले. मात्र अँड्रॉइड फोनची ऑपरेटिंग सिस्टीम फोनमधील विविध विभाग वापरण्याची परवानगी त्या अॅप्लिकेशनला देतो. त्यामुळे अँड्रॉइडधारक कोणतीही माहिती अॅपद्वारे आरामात शेअर करू शकतात, असे त्यांनी सांगितले. ‘व्हॉट्सअॅप’ची जुनी आवृत्ती खूपच असुरक्षित होती. एकदा वेब सव्र्हरवर अपलोड केल्यानंतर या जुन्या ‘व्हॉट्सअॅप’मधील माहिती कोणीही वाचू शकत होते. तसेच ‘व्हॉट्सअॅप’च्या नवीन आवृत्तीतही संगणकीय प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. खरे तर फेसबुकला ‘व्हॉट्सअॅप’ विकत घेण्याची काहीच गरज नव्हती, असे बोस्कर्ट यांनी गमतीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


two + 8 =