शाळेतून विद्यार्थी बेपत्ता

यवतमाळ-दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडा येथील विद्यार्थी चार दिवसापासून बेपत्ता  झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश मधुकर रामकर (१३) रा. चाणी कामठवाडा हा जिल्हा  परिषद उच्च प्राथमिक शाळेत सहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. १० फेबु्रवारी रोजी तो सकाळी शाळेत गेला मात्र सायकाळ होऊनही घरी परत आला नाही. या प्रकरणाची तक्रार लाडखेड पोलिसात दिली. पोलीस व नातेवाईकांनी गणेशची शोधमोहीम सुरू केली असून अजुनही थागपत्ता लागला नाही. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 × five =