
यवतमाळ, दि. २२ – कळंब येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक कन्या शाळेतील इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी जळाल्याची घटना शुक्रवारी घडली.
वैष्णवी काळे असे विद्यार्थीनीचे नाव असून ती कळंब येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक कन्या शाळेत ती सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. २० फेबु्रवारी रोजी ती भाजीची बकेट उचलून नेत असताना, ती खाली पडली. त्यावेळी अंगावर गरम भाजी सांडल्याने ती जळाली. विद्यार्थीनीची ओरड ऐकून शिक्षकांनी तेथे धाव घेऊन तिला रुग्णालयात भरती केले असून तीची प्रकृती चांगली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी विरुद्घ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.









