झरी जामणी (यवतमाळ) – धानोरा येथील विवाहीत शिक्षकाने प्रेयसीच्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पाटण पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीविरुद्घ गुन्हा दाखल केला.
गंगाराम आनंद बरपटवार (५०) रा. धानोरा असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून तो जिल्हा परिषद शाळा खडकडोह येथे कार्यरत होता. झरी येथील एका विधवा महिला कोडपाखिंडी येथे शिक्षीका म्हणून कार्यरत असताना त्याची ओळख झाली होती. काही दिवसाने त्याच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने बरबटवार हे गत १७ वर्षापासून महिलेच्या घरी राहत होता. अशातच काही दिवसापासून त्याच्यात भांडण-तंटे सुरु होते. दोन दिवसापूर्वी त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी महिला या शिक्षकाला अपमानास्पद व अर्वाच्य भाषेत बोलली होती. त्यामुळे वाईट परिणाम होऊन बरपटवार याने प्रेयसिच्या घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही बाब निदर्शनास येताच प्रेयसीने शिक्षकाच्या मुलाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली. कुटुंबीय व नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट पाटण पोलिस ठाण्यात नेऊन आरोपीच्या अटकेची मागणी केली. अन्यथा अत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी पाटणचे ठाणेदार मसराम, मुकुटबनचे ठाणेदार असलम खान यांनी नातेवाईकांची समजुत काढली. याप्रकरणी प्रतीक गंगाराम बरपटवार याने पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये सदर महिलेच्या तक्रारीवरून बरपटवार याने आत्मत्या केल्याचे नमुद केले होते. त्यावरून पोलिसांनी प्रयेसिविरुद्घ आत्महत्येस प्रवृत्त गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास ठाणेदार मसराम करीत आहे.









