
नेर – तालुक्यातील दगडधानोरा येथील सहाय्यक शिक्षक एक वर्षापासून शाळेतील विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे करीत असल्याची घटना आज उघडकीस आली. विद्यार्थी व शिक्षकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाºया घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर महिलांनी शाळा गाठून शिक्षकाला जाब विचारला. त्यावर शिक्षकाने माफी मागून शाळेतून पळ काढला.
दगडधानोरा येथे जि.प. प्राथमिक शाळा असून १ ते ४ पर्यंत वर्ग आहे. लक्ष्मण पिलावन रा. अमरावती हा शिक्षक कार्यरत आहे. सदर शिक्षक १ वर्षापासून १३ विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे करीत होता. या बाबत कुणाला सांगितल्यास नापास करण्याची भिती मुलींना सतावत होती. हा त्रास वाढत गेल्याने अख्ोर मुलींनी सुरू असलेला प्रकार पालकांना सांगितला. आज दुपारी २ वाजताच्या महिलांनी शाळेत धडक दिली. मुख्याध्यापकांनी मध्यस्थी करून घटनेबद्दल शिक्षकाला माफी मागण्यास सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पं.स.सभापती भरत मसराम, विस्तार अधिकारी एन.एन. तांबेकर, गणेश मेंढे यांनी शाळेला भेट दिली. तोपर्यंत शिक्षकाने शाळेतून पलायन केले होते. विस्तार अधिकारी एन.एन. तांबेकर यांनी ५ विद्यार्थीनींचे बयाण नोंदविल्याचे सांगितले. पालकांनी तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली असून वृत्तलिहेस्तोवर गुन्हा करण्यात आला नव्हता. या घटनेमुळे पालकात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शिक्षकावर कडक कारवाई- मसराम
या घटनेची तक्रार मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना घेवून शाळा गाठली. मात्र तोपर्यंत शिक्षक पसार झाला होता. पीडित मुलींचे बयाण घेतले असून, शिक्षकावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पं.स.सभापती भरत मसराम यांनी दिली.









