शिक्षकानेच केला पत्नीचा खून
यवतमाळ – पाटणबोरी येथील शर्मा नगरातील महिलेचा रक्ताच्या थारोळ््यात मृतदेह काल आढळला होता. आज पांढरकवडा पोलिसांनी संशयीत म्हणून शिक्षक असलेल्या पतीस चौकशीसाठी ताब्यात घेतले असता खूनाची कबुली दिली.
सुभाष खुशाल गांगुलवार (३५) रा. शर्मा नगर पाटणबोरी असे आरोपीचे नाव असून तो राजीव विद्यालय कारेगाव पारंबा येथे शिक्षक आहे. ११ वर्षापूर्वी आतेबहिण वाणी हीच्यासोबत विवाह झाला होता. शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी वाणी गांजुलवार (३०) रा. शर्मा नगर हीचा रक्ताच्या थारोळ््यात मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. डोक्यावर जबर मार लागल्याने तीचा मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्घ खुनाचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सदर महिलेवर अत्यसंस्कार करण्यात आले. पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्घ अढाव , बलराम शुक्ला यांनी तपासाची चक्रे फिरवून चौकशी सुरु केली. यामध्ये पती सुभाषवर पोलिसांचा संशय बळावल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अगोदर त्याने उडवाउडविचे उत्तरे दिली, त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीने आपल्या गालावर थापड मारल्याने संतातून तीच्या डोक्यावर हातोडा मारल्याने तीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली.









