शिवसेनेकडून वैदीकांच्या पुतळ््याचे दहन

हाफीज सईद मुलाखत व कश्मीर वक्तव्याचा निषेध
यवतमाळ – २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर मार्इंड हाफीज सईदची मुलाखत घेउन, कश्मीर संदर्भात बेजबाबदार वक्तव्य करणाºया वेदप्रकाश वैदीक यांचा जिल्हा शिवेसनेने निषेध नोंदवित आज बुधवारी दत्त चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळला.
गेल्या काही दिवसापुर्वी वेदप्रकाश वैदीक यांनी पाकिस्थानात जाउन, दहशवादी हल्ल्याशी संबधीत असलेल्या हाफीज सईदची मुलाखत घेतली. तसेच कश्मीर संदर्भात बेजबाबदार विधान केले. याबाबतचे छायाचित्र देशभरातील वृत्तपत्रात प्रसिध्द  झाल्याने याचे पडसाद यवतमाळात उमटले असून, आज जिल्हा शिवसेनेने दत्त चौकात वैदिक यांच्या विरोधात नारेबाजी करून निषेध नोंदविला.  जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, राजेंद्र गायकवाड, तालुका प्रमुख किशोर इंगळे, शहर प्रमुख पराग पिंगळे यांच्या नेतृत्वात वेदप्रकाश  वैदीक यांच्या प्रतिकात्मक पुतळ जाळण्यात आला. यावेळी संजय रंगे, सुरेश ढेकळे, राजू टोंबरे, संतोष गदई, गिरीष व्यास, अरूण वाकडे, प्रमोद जाटे, काजल काबंळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × = eighteen