शेखर वांढरे यांना तिरंगा कलागौरव पुरस्कार

a8371992791246b5715b4c20745737e3

यवतमाळ – नांदेड येथील  तिरंगा परिवार प्रतिष्ठानव्दारा आयोजित कला वैभव व कला गौरव पुरस्कार २०१४ हा कार्यक्रम जागतिक कला दिन २५ आॅक्टोंबर रोजी असतो. परंतु काही कारणास्तव यावर्षी हा कार्यक्रम १५ नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह येथे पंडीत श्रीशाम गुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्ह्यातील परिचित पोलिस कलावंत पोलिस हवालदार शेखर वांढरे वारली चित्रकार आणि टाकावू वस्तुपासून शोभावंत वस्तु बनविण्यात करीता त्यांना तिरंगा कला गौरव पुरस्कार, मानपत्र, स्मृती चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कलाकारांची कला नेहमी जगासमोर येते परंतू कलाकार हा मागेच राहतो म्हणून दरवर्षी विविध क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे. कलाकारांना तिरंगा परिवार नांदेड हे कला वैभव व कला गौरव पुरस्कार देतात. यावेळी कार्यक्रमाचे संचालन मिर्झा फयाज बेग यांनी केले. कार्यक्रमाला सतपाल सिंग, प्रा.विजय पेंडकर (बेग), अनिल कुळकर्णी, अड.मो.शाहीद, विनोद लघवे, सौ.रेणुका कडतन, महेंद्र सिंग गौर, डॉ.मुकुंद मुळे, श्रीनिवास भुयेवार, संजय वर्मा, साहेबराव गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 × = seventy two