शेतकरी विधवा करणार पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण

1st may 1
यवतमाळ, दि.१  – आपली हाक व बोंब आता राज्यात कोणीही ऐकत नाही सरकार विदर्भाच्या कोरडवाहु शेतकºयांच्या संपुर्ण पीककर्ज माफी व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्यास तयार नाही व सरकारने सर्व शेतकºयांचा विश्वासघात केला असून संपुर्ण जगात फिरणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले दुख दूर करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आता राजधानी दिल्लीला जाऊन शेकडो शेतकरी विधवा पंतप्रधान निवसाबाहेर उपोषण सत्ताग्रह करण्याच्या एकमुखी ठराव आज पांढरकवडा येथे आयोजित सात बारा कोरा करा या आंदोलनात घेण्यात आला . हा ठराव विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या सचिव अपर्णा मालीकर यांनी मांडला. आंदोलनात सहभागी शेतकरी विधवा व दुष्काळग्रस्त  शेतकºयांनी  पाठींबा दिला.
कर्ज मुक्तीसाठी सरकारला बाध्य करण्यासाठी शेतकºयांचे  सर्व पक्ष ,पंथ व विचार सोडून करा वा मारा असे टोकाचे सात बारा कोरा करा आंदोलन सुरु करण्याची घोषणा कापुस उत्पादक शेतकºयांचा प्रश्नांवर मागील दोन दशकापासून सतत लढा देणारे शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी हे आवाहन यावेळी बोलताना केले . या आंदोलनात विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबी बैस ,भारती पवार ,चंद्रकला मेश्राम ,अचर्ना राउत ,अंजु भुसारी ,इंदु आष्टेकर ,सुनिता पेंदोरे ,जनाबाई घोडाम सह शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते मोहन जाधव ,प्रेम चव्हाण ,सुनील राउत ,किरण कोल्वते ,प्रीतम ठाकूर ,अंकित नैताम, गोपाल शर्मा , मनोज मेश्राम  ,मुरली वाघाडे ,रामभाऊ मुत्तलवार , शेखर जोशी ,संतोष नैताम ,प्रकाश बोलेनवार ,भीमराव नैताम ,यशवंत गोलमवार , श्रीराम आत्राम ,भास्कर टेकाम ,अतुल कुडवे ,सीताराम आडे,भारत धुर्वे ,रामकुल कुमरे ,माधव तोडसाम सह शेकडो शेतकरी विधवांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 + four =