शेतकºयांनी ठोकले वीज वितरणला कुलुप

ghatanji
घाटंजी -(तालुका प्रतिनिधी)
निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच शेतकरी संकटात असून भारनियमनामुळ े कृषी पंपाना विजपुरवठा नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके वाळत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शेतकºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज कंपनीचे अभियंता गैरहजर असल्याने संतप्त शेतकºयांनी कर्मचाºयांना बाहेर हाकलुन कार्यालयाला कुलुप ठोकले.
ग्रामीण भागातील गावामध्ये येथील वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो. मात्र वीज वितरण कंपनीच्या तुघलकी कारभार सुरू असून भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तसेच शेतकºयांना कृषी पंपाना सुरळीत विज पुरवठा केल्या जात नाही. त्यामुळे शेतकºयांना पिकाला रात्रीच्यावेळी जाऊन पाणी द्यावे लागते. गत काही महीन्यापासून भारनियमना व्यक्तीरीक्तही वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिके सुकत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. दरम्यान आज तालुक्यातील शेतकºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज अभियंता गैरहजर असल्याने समस्या सांगायची कुणाला असा प्रश्न उपस्थित करून सदर अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. यावेळी अधिकाºयाने मी माझ्या पदाचा राजीनामा दिला, तुम्हाला जे करायचे ते करा असे उध्दट उत्तर दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयातील कर्मचाºयांना बाहेर हकलुन कुलुप ठोकले व पोलीस ठाण्यात चाब्या जमा केल्या. यावेळी गुणवंत नाखले, सुरेश ठाकरे, सुदाम इंगोले, श्रीकांत कस्तुरे, गजानन पेंचलवार,  रामधन चव्हाण, परिश्रीत विरंदडे, राजू मानकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven × 9 =