शेतकºयांनो आत्महत्या करू नका! – विरोधी पक्षनेते आ. शिंदे

DSCN0417
नेर – शेतकºयांचे व्यथित मन व पिकांची भिषण अवस्था विरोधी पक्षनेते आ. एकनाथ शिंदे यांनी आज अनुभवली. सत्तेत असो अथवा नसो,शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. धिर ठेवा आत्महत्या करू नका, अशा शब्दात दुष्काळग्रस्त शेतकºयांना आवाहन केले.
आज विरोधी पक्षनेते आ. शिंदे यांनी तालुक्यातील लोणी, नेर, कोलुरा या दुष्काळग्रस्त गावातील शेतीची पाहणी करून शेतकºयांशी संवाद साधला. शेतकºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात शेतकºयांचे सात्वन केले. आ. शिंदे यांनी प्रफुल्ल कावरे यांच्या शेतीची पाहणी केली. त्यांनी चार एकरात पिकांची पेरणी केली होती. मात्र तूर व सोयाबीन वन्यप्राण्यांनी फस्त केली. वनविभागाच्या अधिकाºयांची भेट घेवून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. लोणी येथे मोहन आडे यांनी खरीप हंगामातील पिकांची कैफीयत मांडली. शासन शेतकºयांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याचा आरोप केला. नेर येथे परमानंद अग्रवाल यांच्या निवास्थानी विरोधी पक्षनेते आ. शिंदे यांनी शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी रवींद्र राऊत, नरेंद्र खोब्रागडे, गजानन तंबाखे यांनी सततची नापिकी, पिकांना मिळत नसलेला हमीभाव, कर्ज, भारनियमन यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत असल्याचे सांगितले. कोलुरा येथे प्रभाकर शिरगवरे यांच्या कपाशीची पाहणी केली. सोनवाढोणा येथील केदारेश्वर हरडे या शेतकºयाने दहा दिवसापासून डिपी बंद असल्याचे सांगितले. सोयाबीनने दगा दिला. पत्नीचे दागिने गहान ठेवून गव्हाची पेरणी केली. मात्र डि.पी. बंद असल्याने पुन्हा ५० हजाराचे नुकसान झाले असे सांगून अश्रूंना मोकळी वाट करून दिली. यावेळी आ. शिंदे यांच्यासह उपस्थितांचे डोळे पाणावले होते. यावेळी आ. संजय राठोड, आ. प्रताप सरनाईक, आ. सुनील राऊत, आ. संजय रायमुलकर, आ. बाळू धानोरकर, , माजी आ. संजय बंड, माजी आ. श्रीकांत मुनगिनवार, माजी आ. विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष पवन जयस्वाल,पं.स.सभापती भरत मसराम, बाबू पाटील जैत, परमानंद अग्रवाल, संजय दारव्हटकर, गजानन भोकरे, भाऊराव ढवळे, नामदेव खोब्रागडे, रेखा शेटे, मिना खांदवे, प्रशांत मासाळ, नितीन कराळे, प्रवीण राठोड, निखिल जैत, किशोर अरसोड, भास्कर तुपटकर, निलेश शेटे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार संदीप अपार, बीडीओ गौतम भगत, मनोहर झंझाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 5 = six