शेतकºयाकडील दीड लाख लुटले

यवतमाळ  –  बँकेतून पैसे काढून गावाकडे जाणाºया शेतकºयाची दुचाकी अडवून मारहाण करून १ लाख ६८ हजार रुपये लुटल्याची घटना आज सायंकाळी ६.३० वाजता महागाव तालुक्यातील माळेगाव घाटात घडली. सातघरी येथील शेतकरी लखीराम गणू राठोड यांनी काळी दौ. येथील कृषी केंद्र चालकाकडून बियाणे, रासायनीक खत  खरेदी केली होती. उधारीचे ६० हजार रुपये देण्यासाठी व पेरणीसाठी लागणारे बियाणे खरेदी करण्यासाठी  महागाव येथील युनियन बँकेतून  १ लाख ६८ हजार रुपये काढले होते. पिशवीमध्ये पैसे ठेऊन कबिदास पवार यांच्यासोबत एम.एच. २९ / एक्स ९५०७ मोटरसायकलने गावाकडे जात होते. अशातच माळेगाव घाटात  आरोपी रमेश भाटू राठोड, राहुल रमेश राठोड रा. हुडी ता. पुसद यानी दुचाकी अडवून शेतकºयाला खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर सदर रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five + 3 =