
आर्णी, दि २४ – संपूर्ण देशात नरेन्द्र मोदी यांच्या चहा पे चर्चा या कार्यक्रमाने प्रसिद्ध झालेल्या दाभडी येथे मंगळवारच्या सकाळी साडे पाच वाजता स्वताच्या घरात गळफास लावुन शेतककºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली. विठ्ठल सवाई राठोड (४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. सदर शेतकºयावर विविध कार्यकारी सोसायटीचे ३५ हजार रुपए कर्ज आहे.अडीच एकर कोरडवाहु शेती असून सतत नापीकीने त्रस्त झालेल्या विठ्ठल राठोड यांनी राहत्या घरीच गळपास लावुन जिवन यात्रा संपविली. शेतकºयाच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि पत्नी असा आप्त परिवार आहे.









