शेतीच्या वादातून भावाचा खून

download
यवतमाळ, दि. १० – वडीलो पार्जीत शेतीच्या हिस्सेवाटणीवरून उद्भवलेल्या वादात सळाखीचे घाव घालून मोठ्या भावाचा खून केल्याची घटना काल गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील पोखरी येथे घडली.
नारायण किसन डाखोरे (५५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. तर परशुराम किसन डाखोरे (४५) असे आरोपीचे नाव आहे. डाखोरे बंधूची काळी दौ. येथे वडीलोपार्जीत चार एकर शेती आहे. कुटुंबातील पाच सदस्य या शेतीचे वारस आहेत. दरम्यान यापूर्वी कुटुंबातील एका भावाचा मृत्यू झाला होता. उर्वरीत चार भावंडामध्ये शेतीची हिस्सेवाटणी करण्याची प्रक्रीया सुरू होती. घटनेच्या दिवशी काल रात्री नारायण डाखोरे हे जेवन आटोपून अंगणात खाटेवर झोपले होते. तर त्यांची पत्नी जीजाबाई व मुलगा विनोद बाजुलाच जेवन करीत होते. याच दरम्यान दारुच्या नशेत आरोपी परशुराम डाखोरे हा हातात लोखंडी सळाख घेऊन त्या ठिकाणी धडकला. काही कळायच्या आत अनपेक्षीतपणे त्याने अचानक वडील बंधूच्या नारायणवर सपासप सळाखीने प्रहार केले. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या नारायणला पुढील उपचारासाठी पुसद येथे नेत असतांना वाटेत कासोळा गावाजवळ त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ठाणेदार प्रकार शेळके यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान आरोपीने पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 × seven =