शॉक लागून बालकाचा मृत्यू, संतप्त जमावाची वीज वितरणवर धडक

IMG-20150302-WA0019
फुलसावंगी (यवतमाळ),दि. २ – विद्युत खांबाच्या तंगाव्याच्या ताराला स्पर्श होऊन बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रामुनाईक तांडा (नारळी)येथे आज सोमवारी सकाळी घडली. यावेळी संतप्त नागरिकांनी बालकाचा मृतदेह घेऊन महावितरण कार्यालयावर धडक देऊन बेजबाबदार कर्मचाºयांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.
भोला गजानन आडे (४) असे मृतक बालकाचे नाव आहे. तर कल्पना बाळू राठोड ही महिला जखमी झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे. सकाळी आजोबाच्या घराकडे जात असताना वाटेत असलेल्या विद्युत खांबाच्या तंगाव्याला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी येथे दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी सदर बालकाला मृत घोषित केले. यावेळी संतप्त जमावाने बालकाचा मृतदेह घेऊन थेट महावितरण कार्यालयात धडक देऊन सहाय्यक वीज तंत्रज्ञ जि. एच. पारसकर यांच्यावर विविध गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यांची मागणी केली. उघड्या सताड रोहित्र त्यामध्ये फिऊज नसने, ताराणा गार्डिग नसने ही बाब जागो जागी पहावयास मिळत आहे. याबाबतची तक्रार विजय आडे यांनी महावितरणकडे केली होती. मात्र या गंभीर बाबीकडे सदर कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच महागावचे उप. कार्यकारी अभियंता गजभीय हे येथे दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाला दोषी कर्मचाºयांवर येत्या तीन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 + six =