संजय दत्तला वारंवार मिळणा-या सुट्टीची चौकशी

download (2)
मुंबई- बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता संजय दत्तला वारंवार मिळणा-या संचित रजेची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबईत १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झालेल्या संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणा-या संजय दत्तला प्रथम वैद्यकीय कारणामुळे ऑक्टोबर २०१३मध्ये २८ दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर पत्नी आजारी असल्याने त्याला डिसेंबर २००१३मध्ये पुन्हा २८ दिवसांची रजा मिळाली होती. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये त्याला २८ दिवसांची आणखी रजा वाढवून देण्यात आली.
त्यानंतर आता बुधवारी(२४ डिसेंबर) पुन्हा त्याला १४ दिवसांची रजा मंजूर झाली आहे. संजय दत्तला मिळणा-या वारंवार सुट्टीमुळे टीका होत आहे. विशेष म्हणजे याआधी या प्रकरणी खुद्द न्यायालयाने सरकारला जाब विचारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × nine =