यवतमाळ ,दि. ११ – देश आज विपरित परिस्थितीतून जात आहे. इतक्या वर्षानंतरही आपला देश परिपूर्ण होऊ शकलेला नाही. भ्रष्टाचाराने देशाला पोखरून सोडले आहे. देशाच्या वर्तमान स्थितीवर विचारमंथन करून संयुक्त प्रयत्नानेच देशाचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे अखील भारतीय सहसंपर्कप्रमुख अरुणकुमारजी यांनी केले. स्थानिक पोस्टल मैदानावर आयोजित रा.स्व.संघाच्या एकदिवसीय साधना सम्मेलनात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की संघाच कार्य देशवासियांना एकसंघ करने आहे. कार्यकर्त्यांच्या शक्तिवर समाजाला संघटित करणारी शक्ति निर्माण करायची आहे. एका महान व्यक्तिमुळे देश महान होत नसतो, देशाला महान बनविण्यासाठी सपूर्ण समाजाला महान बनने आवश्यक आहे. देशातील अंतर्गत मदभेद दूर होने गरजेचे आहे असेही ते म्हणाले. यावेळी व्यावपिठावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थीत होते.









