संशयातून पत्नीचा खून

download (5)
पुणे – मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कोथरूडमधील किष्किंधानगर येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दीपक हरी जाधव (वय ३१) आणि त्याची पत्नी तेजश्री (२०, रा. किष्किंधानगर, कोथरूड) हे दोघे मृतावस्थेत सापडले होते. दीपकने तेजश्री हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन गळा दाबून तसेच डोक्यावर मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर स्कार्फच्या सहाय्याने स्वत: गळफास घेतला, अशी माहिती कोथरूड पोलिसांनी दिली.
बुधवारी ३१ डिसेंबर रात्रीपासून हे दोघे शेजाऱ्यांना दिसले नव्हते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. तेजश्री हिच्या दोन्ही हातांना आणि गळ्याजवळ रक्ताचे डाग होते. त्यामुळे दीपकने आपल्या हाताच्या शिरा कापून घेतल्यानंतर तिचा गळा दाबला असावा, त्यानंतर तिला डोक्यावर मारहाण करून खून केल्यानंतर गळफास घेतला असावा, असे पोलिसांनी सांगितले. तेजश्री ही दीपकची दुसरी पत्नी असून सुमारे एक वर्षापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला आहे. त्याची पहिली पत्नी विभक्त झाली आहे. दीपक आणि त्याच्या पहिल्या पत्नीची दोन मुलेही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − = five