संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित

parliment
नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य मुरली देवरा यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मुरली देवरा यांच्यासह निधन झालेल्या इतर सदस्यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
अधिवेशनाच्या सुरुवातीस नव्या खासदारांनी यावेळी शपथ घेतली. बीड लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रितम मुंडे यांनीही मराठीत शपथ घेतली. त्यानंतर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याचे जाहीर केले. महिनाभर चालाणा-या या अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. वस्तू आणि सेवा कर विधेयक, जमिन अधिग्रहण विधेयक तसेच जीएसटी कर विधेयक मांडली जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाध्ये मांडल्या जाणा-या विमा विधेयक तसेच काळ्या पैशाच्या मुद्दयावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. दरम्यान, संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडेल. विरोधकांचेही सरकारला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केली. २३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


1 × = seven