सचिन लवकरच रुपेरी पडद्यावर

Sachin Tendulkar's 40th birthday celebrations
नवी दिल्ली  दि. ८  – दोन दशकाहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवणारा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच त्याच्या चाहत्यांना चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपटात खुद्द सचिन भूमिका करणार आहे.
सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी मुंबई स्थित ‘२००नॉट आऊट’ ही निर्मिती संस्था काम करत आहे तर पुरस्कार विजेते ब्रिटीश लेखक जेम्स एरस्किने या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या वर्षाच्या शेवटी अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती निर्मिती संस्थेच्या प्रवक्त्यांनी यावेळी दिली. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. तर १०० शतके ठोकली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five × = 10