सट्टा बाजार : मोदींला १.३० पैसे तर राहुल गांधींसाठी ३ रूपये

thumb
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुंबई सट्टा बाजार आत्तापासूनच तापू लागला असल्याचे व आजच्या तारखेला ९० कोटी रूपयांचे बेटींग घेतले गेल्याचे वृत्त आहे. वास्तविक निवडणुक काळात मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बेटींगची सुरवात होत असते. मात्र भाजपने मोदींचे नांव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले आहे आणि भाजप व काँग्रेस यांच्यातच थेट सामना होणार असल्याचे आता स्पष्ट झाल्याने सट्टेबाजांनी सट्टा लावण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी बेटींग ओपन करण्यात आले असल्याचेही समजते.
यात पंतपअधानपदी मोदींच्या नावाला रूपयाला १.३० पैसे असा दर निघाला आहे. हाच दर राहुल गांधींसाठी ३ रूपये, मनमोहनसिंग यांच्यासाठी १२ रूपये तर सोनिया गांधी यांच्यासाठी १३ रूपये असा आहे. मुंबई अहमदाबाद, जयपूर, इंदोर, कराची व दुबईतून या सट्टावर पैसे लावले जात असल्याचेही समजते. अर्थात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हा बेटींगचे दरही बदलतील असेही सांगितले जात आहे. सट्टा खेळणारे आणि सट्टा घेणारे दोघेही बारकाईने राजकीय प्रवाह, निवडणुक, राजकीय डावपेच यांवर बारकाईने नजर ठेवून असतात असे तज्ञ सांगतात.
लोकसभा निवडणुकांत भाजप २७२ जागा मिळवेल यासाठीचा दर सध्या रूपयाला दीड रूपया असा निघाला आहे. काँग्रेससाठी हा दर ५ रूपये आहे. देशात पाच राज्यात या वर्षात होत असलेल्या विधानसभेसाठी चार राज्यांतील निवडणुकांसाठी सटटा सुरू झाला आहे. सट्टेबाजांनी मिझोराममधील निवडणुकांत कांहीही रस दाखविलेला नाही. उर्वरित चार राज्यात दोन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आहे. शील दीक्षित यांच्या दिल्लीसाठी भाजपचा दर अडीच रूपये तर काँग्रेससाठी हाच दर ४.६० पैसे इतका आहे. मध्यप्रदेशात भाजपसाठी २ रूपये तर काँग्रेससाठी साडेचार रूपये, छत्तीसगढ मध्ये भाजपसाठी २.१० पैसे तर काँग्रेससाठी साडेचार रूपये व राजस्थानात हाच दर भाजपच्या वसुंधरा राजेंसाठी सव्वातीन रूपये तर काँग्रेससाठी ४.६० पैसे असा असल्याचेही सागितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four × = 32