सत्ताधाºयांकडून गारपिटीचेही राजकारण – राज ठाकरे यांचा आरोप

jpg
यवतमाळ : राज्यातील  शेतकरी गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपापल्या पक्षाचे मतदारसंघ असलेल्या भागात पाहणी करण्यासाठी गेले.  सत्ताधाºयांनी गारपिटीचेही राजकारण केले, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.  यवतमाळ-­वाशीम लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारार्थ येथील पोस्टल मैदानावर  आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, हेमंत गडकरी, प्रवीण बरडे, श्रीधर जगताप, विठ्ठल लोखंडकर, उमेदवार राजू पाटील राजे, मनसेचे जिल्हाप्रमुख राजू उंबरकर, अभय गडम, अशोक पुरी यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले की,  सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ही जिल्ह्यासाठी भूषणावह गोष्ट नाही. दु:ख प्रत्येकालाच असतं, पण आत्महत्या कोणत्याही संकटाला पर्याय होऊ शकत नाही, असा धीर राज ठाकरे यांनी शेतकºयांना आपल्या भाषणातून दिला. गेल्या ६५ वर्षांपासून त्याच त्या प्रश्नांवर निवडणुका लढविल्या जात आहेत. रस्ते, वीज, पाणी आणि नोकरीची आश्वासने यातच काँग्रेसने आजपर्यंत मतदारांना जखडून ठेवल्याचा आरोप केला. राज्यात दररोज उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमधून तब्बल ४८ ट्रेन खचाखच भरून येतात. रेल्वेमधील नोकरीपासून रेल्वे कॅँटीनपर्यंत सर्व ठिकाणी परप्रातीयांनी अतिक्रमण केले आहे. आमच्या महाराष्टÑातील मराठी तरूण काम करत नाही, म्हणून रेल्वेसह अन्य ठिकाणी परप्रांतीय बाजी मारतात, असा आरोप केला जातो. हा आरोप साफ चुकीचा असून, आपण ज्यांना दिल्लीत खासदार म्हणून निवडून पाठविले ते लोकप्रतिनिधी रेल्वेसह केंद्राच्या इतर विभागात कधी, कोणत्या रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, याची माहितीच आपल्यापर्यंत पोहचवित नसल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेने रेल्वे भरतीसाठी सहा लाख मराठी तरूणांचे अर्ज भरले पण आजपर्यंत एकही कॉल आला नाही, अशी खंत व्यक्त केली. सभेला विक्रमी गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 5 = thirty five