सत्यमेव जयते – पुरुषांची ‘मर्दानगी’

3
मुंबई (प्रतिनिधी) – अनेकदा देशातील हिंसाचारांच्या घटनांना पुरुष कारणीभूत असतात. पौरुषत्वाच्या भावनेने हा हिंसाचार घडतो. मात्र कधी कधी हेच पौरुषत्व मात्र अनेकांना हानीकारक ठरते. याच विषयावर सत्यमेव जयतेच्या सहाव्या भागात चर्चा करण्यात आली. सत्यमेव जयतेचा तिस-या पर्वातील हा अखेरचा भाग होता.
यावेळी आमिरने हिंसाचारांच्या घटनांमध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तसेच वाढते रॅगिंगचे प्रमाण या मुद्द्यावरही या भागात भाष्य करण्यात आले. पुरुषत्व सिद्ध करण्याच्या ईष्येने अनेकदा अॅसिड हल्ला, बलात्कार यांसारख्या भयानक घटना घडतात. अ‍ॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी या युवतीसोबतही आमिरने या भागात चर्चा केली. तसेच कंगना राणावत, दिपीका पदुकोण आणि परिणीती चोप्रा या तीन बॉलीवूड अभिेनेत्रींनीहीया भागात सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ two = 6