
यवतमाळ – जिल्ह्यातील बेघर, भूमिहीन, वैयक्तीक सहकारी जमिन मागणी अर्ज भरुन जिल्हा कार्यालयात देण्यासाठी १४ मार्च रोजी पोस्टल ग्राऊंड येथे लोकशासन आंदोलनाचे आयोजन केले होते. याबाबत परवानगी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने आंदोलनाची परवानगी नाकारल्याने न्या. कोळसे पाटील यांनी मोर्चा ऐंवजी सभेला परवानगी मिळविली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक कष्टकरी, नागरिक, महिला सकाळपासून पोस्टल मैदानावर जमले होते. दुपारी २ वाजल्यानंतरही आंदोलनाचे अध्यक्ष न्या. कोळसे पाटील आले नव्हते त्यामुळे नागरिक भर उन्हात बसुन होते. त्यानंतर काही वेळातच सभेच्या ठिकाणी येताच नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी आंदोलनात राजकीय पक्ष व प्रशासनावर घाणाघात केला. यावेळी त्यानी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करुन त्याना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.









