
यवतमाळ – वणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी ३० हजाराची लाच स्वीकारणाºया सहाय्यक फौजदारास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पोलीस दलात कार्यरत कर्मचाºया खळबळ उडाली आहे. सय्यद जहिरोद्दीन बहाउद्दीन उर्फ बाबर असे अटक करण्यात आलेल्या सहाय्यक फौजादाराचे नाव आहे. आदीलाबाद येथील डी.पी. चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या स्वाधीन करीत नाही. तसेच आदिलाबादमध्ये दाखल गुन्ह्यात क्लिनचिट मिळवून देतो असे म्हणून सहाय्यक फौजदाराने ३० हजाराच्या लाचेची मागणी केली. संबंधित व्यक्तीने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून एसीबीच्या पथकाने तक्रारीची सहानिशा करून सापळा रचला. तक्रारकर्त्याने पैसे स्वीकारण्यासाठी सहाय्यक फौजदारास आपल्या राहत्या घरी बोलावले. ३० हजार रुपयाची लाच स्वीकारताच पथकाने लगेच रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लोन्हरकर, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड, अमोल महल्ले, नीलेश पखाले, शैलेश ढोणे, अमित जोशी, अनिल राजकुमार, सुधाकर मेश्राम, प्रकाश शेंडे, विशाल धलवार यांनी केली. या कारवाईमुळे पोलिसांचे धाबे दणाणले आहे.









