यवतमाळ, दि. २ – वडगाव जंगल वनपरीक्षेत्रातील सागवान वृक्षांवर कुºहाड चालली असून बेवारस पाच घनमीटर माल जप्त करण्यात आला. यामध्ये वनपरीक्षेत्र अधिकाºयाचा हात असल्याचे बोलले जात आहे.
यवतमाळ वनवृत्तातील राखीव वनातून सागवान वृक्षांची कत्तल राजरोसपणे सुरू आहे. यवतमाळ, जोडमोहा, हिवरी वनपरीक्षेत्राला सागवान ठेकेदारांनी आपला अड्डाच बनविला आहे. जोडमोहामधिल गणेशवाडी व टपालहेटी येथील धाडीत डिएफओच्या हाती परीपक्व सागवानचे तीन तर अपरिपक्व सागवानचा एक ट्रक हाती लागला होता. मात्र अधिकारीच ठेकेदार निघाल्याने हा विषयच दडपण्यात आला. सागवान तस्करांच्या विरोधात डिएफओ प्रमोदचंद लाकरा यांनी मोहिम गेल्या काही दिवसापासून उघडली असून, यामध्ये वनपरीक्षेत्र अधिकाºयांचे पितळ उघडे पडत आहे. आज गुरूवारी सकाळी वडगाव धानोरा वनपरीक्षेत्रातील राखीव वनात बेवारस सागवान डिएफओला मिळून आले. शेतकºयाच्या शेतातील हे सागवान असल्याचे सांगितले जात असून, त्यावर हॅमर नसल्याने विनापरवान्याचा हा माल असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. सदोबासावळी येथे पकडण्यात आलेला जलतनचा माल देखील संशयाच्या भोवºयात असून, सागवान तस्करांच्या नावाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी व वनरक्षकच वृक्षांची कत्तल करीत असल्याचे बोलल्या जात आहे. डिएफओच्या मोहिमेमूळे अधिकाºयांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. यामध्ये अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.










