सामूहिक प्रयत्नातून धामणगाव (देव) चा विकास – ना. संजय राठोड

unnamed (1)
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील श्री. भगवान मुंगसाजी माउली देवस्थानासह सर्व संस्थानांचा विकास आराखडा तयार करून, लाखो भक्तांचे श्रदधास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राचा सामूहिक प्रयत्‍नातून विकास करण्याची ग्वाही राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिली. मुंगसाजी माउली पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मुख्यदरबार येथे रथपूजनाचा कार्यक्रम आज बुधवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता ना. संजय राठोड यांच्याहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
धामणगाव देव येथे १९ फेब्रुवारीपासून भगवान मुंगसाजी माउलीचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. विदर्भ, मराठवाड्यातील हजारो भाविक पालखी सोहळयासाठी धामणगाव देव येथे दाखल झाले होते. आज हजारो भक्तांनी माउलीच्या दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत रथपूजन, पालखीसोहळा, महाआरती करण्यात आली, तसेच भक्तांना महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांसह मुंगसाजी महाराज देवस्थान मुख्यदरबारच्या विश्वस्त मंडळाने चोख व्यवस्था ठेवली. या कार्यक्रमप्रसंगी ना. संजय राठोड यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलिन्नाथ कलशेट्टी, मुख्य दरबारचे महंत मुरली अंभोरे महाराज, शिवसेना तालुका प्रमुख श्रीधर मोहोड, मनोज सिंघवी, शहर प्रमुख सुधीर दातीर, सरपंच जगदीश जाधव, चिंच देवस्थानचे डॉ. संजय देशमुख, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार प्रकाश राउत, अरविंद गादेवार, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष पंडीत राठोड यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 + = fourteen