
यवतमाळ, दि. १- शहरालगत लोहारा एमआयडीसीतील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीला आग लागुन ७०० रुईच्या गाठी खाक झाल्या. रविवारी रात्री ही घटना घडली असून यामध्ये कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.
सुतगिरणीत कामगार रिसायलींगचे काम करीत होते. दरम्यान गारगोटीमध्ये संघर्ष होऊन ठिणगी ब्लो रुममध्ये उडाल्याने रुममध्ये असलेल्या रुईच्या गाठीनीने पेट घेतला. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण करून तेथील रुई गठाणी कवेत घेतले.ही बाब लक्षात येताच घटनास्थळी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. सहा बंब पाण्याचा मारा केल्यानंतर आज सोमवारी पहाटे ही आग आटोक्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनूप खांडे, मुख्याधिकारी अतूल पंत यांचेसह पोलीस अधिकाºयोनी घटनास्थळाला भेट दिली. या आगीत ७०० रुईच्या गाठी जळून खाक झाल्या असून कोट्यावधीचे नुकसान झाले.









