नाशिक – नाशिकच्या सटाणा महाविद्यालयामध्ये गुरुवारी सकाळी नेपाळी सुरक्षारक्षकाने कु-हाडीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे.
बालबहादूर सिंह असे या हल्लेखोर सुरक्षारक्षकांचे नाव आहे. सकाळी महाविद्यालयाच्या आवारातच त्याने प्राचार्य दिलीप शिंदे, प्राध्यापक सुनील सागर, प्राध्यापक प्रफुल्ल ठाकरे आणि शिपाई दीपक मगरे यांच्यावर हल्ला केला. सर्व जखमींना उपचारांसाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे .हल्लेखोर बालबहादूर सिंहला विद्यार्थ्यांनी आवारातच पकडून चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. नोकरीत कायम करण्याबरोबर पगार वाढवून द्यावा अशी या हल्लेखोराची मागणी होती.मात्र महाविद्यालय व्यवस्थापनाने त्याची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे संतापलेल्या बालबहाद्दूर सिंहने प्राचार्यांवरच हल्ला केला. गेल्या सात वर्षांपासून तो या महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाचे काम करत आहे.









