सुरेश प्रभू यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

index.jpeg1
मुंबई (प्रतिनिधी) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी रविवारी सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला.
व्यवसायाने चार्टड अकाऊंटन्ट सुरेश प्रभू हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. १९९६ मध्ये राजापूर मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या प्रभू यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, उर्जा, अवजड उद्योग, पर्यावरण अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार सांभाळला होता. त्यावेळी प्रभू यांच्या कामाचे सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर प्रभू हे शिवसेनेचे सदस्य असले तरी ते सक्रीय राजकारणात नव्हते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभूंसाठी आग्रह धरला होता. मात्र शिवसेनेने प्रभू यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. मात्र मोदींनी शिवसेनेचा विरोध झुगारुन प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शपथविधीपूर्वी सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + 9 =