सुहास जोशी, निशिगंधा वाड यांना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार

Mahila-Purskar (1)
मुंबई- आयकॉन फाऊंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या पूर्वसंध्येस देण्यात येणा-या महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, धारीवाल फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष शोभा धारीवाल, अभिनेत्री निशिगंधा वाड, प्रख्यात गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. संध्या जैन यांची निवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात शेफ संजीव कपूर यांना देण्यात येणार आहे.
याशिवाय शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, प्रख्यात लेखिका व वक्त्या मानसी देशमुख, पुण्याच्या जागृती संस्थेच्या संस्थापिका विश्वस्त व भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या चेअरमन जयश्री काळे, आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव, उद्योजिका प्रतिभा खोडके यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा सोहळा शनिवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात होणार असून त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकासमंत्री विष्ण सावरा, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. वंदना चक्रवर्ती, विश्वकोष मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड, प्रख्यात उद्योगपती किशोर खाबिया, डॉ. उषा खाबिया, विश्वविख्यात बॅरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. जयंत वाघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयकॉन फाऊंडेशनचे संचालक मनोज वरंदळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 − six =