
सामान्य लोक कांदे-बटाटे, सेल फोन किंवा कार खरेदी करतात, परंतु ‘दबंग’गर्ल सोनाक्षी सामान्य नाही. तिचं कोणतंही काम असामान्य असतं. अभिनयापासून राजकारणाचं ‘बाळकडू’ प्यायलेल्या सोनाक्षीने कबड्डीचा संघ खरेदी केला आहे.
यावर सोनाक्षीचं म्हणणं असं आहे की, एखादा सेलिब्रेटी खेळाशी जोडला जातो, तेव्हा त्या खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत होते. म्हणूनच ९ ऑगस्टला सुरू होणा-या ‘वर्ल्ड कबड्डी लीग’मध्ये ब्रिटनच्या ‘द हायर ग्रुप’ यांच्यासोबत मिळून ‘युनायटेड सिंग्ज’ नावाचा संघच तिने खरेदी केला आहे. ही लीग लंडनमध्ये खेळवली जाणार आहे.आपल्या देशात क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं जात असल्याने इतर खेळ दुर्लक्षित राहतात. म्हणूनच क्रिकेटसारखं इतर खेळांना प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे.कबड्डी हा असा खेळ आहे, जो आपण लहानपणी खेळायचो. हा एक भारतीय खेळ आहे. याची पाळंमुळं येथे रुजलेली आहेत. त्यामुळे मी या खेळाला मोठय़ा स्तरावर घेऊन जाणार आहे. यासाठी वल्र्ड कबड्डी लीगसारखा चांगला प्लॅटफॉर्म असूच शकत नाही, असंही सोनाक्षी सांगते. ‘मी वल्र्ड कबड्डी लीगचा भाग बनण्यासाठी उत्सुक आहे. अशा प्रकारचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लीगमध्ये सहभागी होण्यासाठी शूटिंगचं वेळापत्रकही बनवलं आहे. यापूर्वी अक्षय कुमार आणि हनी सिंगनेही वर्ल्ड कबड्डी लीग संघ खरेदी केले आहेत. आता बघू या.. सोनाक्षीची एंट्री कशी होते ते!









