
यवतमाळ – स्कुलबसने दुचाकीला धडक दिल्याने फौजदार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता वरुड येथे घडली. भाऊराव हनुमंत करे (५७) असे मृतकाचे नाव असून ते दिग्रस पोलिस ठाण्यात सहा. पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. आज पुसद येथे न्यायालयात ते साक्ष देण्यासाठी आपल्या दुचाकीने जात होते. अशातच समोरुन आलेल्या स्कुल बसने दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, यामध्ये करे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घडनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी स्कुल बस चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. या घटनेने दिग्रस येथे शोककळा पसरली होती.









